आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG NEWS : तात्या, किती नाराज.. इकडे या.. वाट पाहतोय : अजितदादांची वसंत मोरे यांना ऑफर अन राजकीय चर्चांना उधाण

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे :प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे गेले काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठी ऑफर दिली आहे. स्वतः वसंत मोरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या पुतण्याच्या लग्न समारंभात अजितदादांनी यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली. ते स्वतः माझ्याकडे आले. ‘अरे तात्या किती नाराज. कधी येताय. वाट पाहतोय’ असं अजितदादा म्हणाले. कदाचित त्यांच्याकडून हा माझ्या कामाचा सन्मान असावा. त्यांनी माझ्या कामाचा गौरव केला. मी ज्या मार्गावर जातोय तो मार्ग योग्य वाटतो, अशा भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केल्या.

वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मनसे शहर पदाधिकारी मेळाव्यात वसंत मोरे यांना बोलण्याची संधी दिली नाही. शहरातील प्रमुख नेते असून देखील बोलण्याची संधी न दिल्याने वसंत मोरे पक्षावर नाराज आहेत.

सध्या तरी वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र ते लवकरच मनसेत राहतात की अन्य पक्षात जातात याबद्दल निर्णय घेतील यांचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी वसंत मोर यांना भेटण्यासाठीही बोलावले असून ते आता काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागले आहे. 


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us