आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

आताची मोठी बातमी : भाटघर धरणात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू; आणखी तीनजण पाण्यात बुडाल्याची भीती, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

पुणे
ह्याचा प्रसार करा

भोर : प्रतिनिधी

भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या जयतपाड येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोघा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, अजूनही तीनजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या ठिकाणी शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सलग सुट्ट्या असल्यामुळे सध्या भाटघर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. भोर तालुक्यातील जयतपाड येथील एका रिसॉर्टमध्ये पुण्यातील काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. यातील जवळपास पाच पर्यटक भाटघर धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यातील दोनजणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून यात एका तरुणीसह एका तरुणाचा समावेश आहे.

स्थानिकांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मात्र आणखी तीन पर्यटक पाण्यात बुडाल्याची माहिती पुढे येत आहे. या तिघांचा शोध लागत नसल्यामुळे धरण परिसरात पोलिस आणि प्रशासनाकडून शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us