Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची हकालपट्टी; पक्षविरोधी कृत्यामुळे कारवाई..?

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहत पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे जयंत पाटील यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रदीप गारटकर हे गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी काम करत होते. अजितदादांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर गारटकर यांनी जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांशी चर्चा केली. मात्र त्यात कोणताही निर्णय झाला नाही. त्याचवेळी दि. ५ जुलै रोजी अजितदादांनी आयोजित केलेल्या बैठकीत गारटकर हे जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांसह हजर राहिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version