आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG BREAKING : आधी पत्नीवर गोळी झाडली; नंतर पुतण्यावरही गोळीबार, शेवटी स्वत:ही गोळी झाडून घेत केली आत्महत्या; सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कृत्यानं खळबळ

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

अमरावतीत सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात गायकवाड यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. सहाय्यक पोलिस आयुक्तांनीच हे पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या घटनेत सहायक आयुक्त भारत गायकवाड यांच्यासह पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, सहायक आयुक्त भारत गायकवाड हे अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यातील बालेवाडी भागात गायकवाड हे आपली पत्नी, दोन मुले आणि पुतण्यासह वास्तव्यास होते.

रविवारी मध्यरात्री ४ वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांनी आधी पत्नी मोनी यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. या आवाजाने त्या ठिकाणी आलेल्या पुतण्या दीपक याच्यावरही त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सहाय्यक पोलिस आयुक्तांनीच टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसरीकडे या घटनेनंतर चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी स्वतंत्र परवाना काढून पिस्तूल घेतले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, गायकवाड यांनी हे पाऊल का उचललं याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us