Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : पुण्याचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची बदली; अंकित गोयल नविन पोलिस अधिक्षक

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची आज बदली झाली आहे. त्यांच्या जागी अंकित गोयल यांची पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच देशमुख यांची बदली झाल्याने पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे.

आज राज्य शासनाने विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर केल्या. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनव देशमुख यांच्या बदलीची चर्चा होती. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली असून बदलीच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version