आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG BREAKING : सुप्रिया सुळेंच्या इंदापूरमधील प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रविण माने अजितदादांसोबत; सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात होणार सक्रिय

पुणे
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूरच्या सोनाई उद्योगसमूहाचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय दिसणार आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे प्रविण माने यांनी निर्णय जाहिर केल्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर इंदापूरमधून प्रविण माने हे शरद पवार गटात सक्रिय होते. दरम्यानच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा प्रविण माने यांच्यावर देण्यात आली होती. मात्र आज प्रविण माने यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका जाहिर केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपण अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं प्रविण माने यांनी सांगितलं.

माने परिवार नेहमीच पवार कुटुंबासोबत राहिले आहे. यापुढेही माने परिवार अजितदादांसोबत असेल असं प्रविण माने यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि इंदापूरच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचंही प्रविण माने यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राजेश जामदार, शिवाजीराव तरंगे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान,  सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुत्रे प्रविण माने यांच्याकडे होती. मात्र त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us