आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG BREAKING : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना १६ जुलैपर्यंत सुट्टी; `या´ तालुक्यातील शाळा मात्र सुरळीत..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना १४ ते १६ जुलै या कालावधीत सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड व शिरुर या तालुक्यामधील शाळा मात्र सुरळीत सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश पारीत केले आहेत.

सध्या राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहिर केली आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

१४ ते १६ जुलैदरम्यान ही सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आणि शिरुर या तालुक्यातील शाळा मात्र नियमीतपणे सुरु ठेवल्या जाणार आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून नियमीत कामकाज करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us