Site icon Aapli Baramati News

गांजा वाहतूकप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; पुण्यात एकाला अटक

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

गांजा वाहतूकप्रकरणी  अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २१ किलो ६७५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस नाईक चेतन दिलीप गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी आंबु दशरथ पवार ( वय ४० वर्षे, मुळ रा. अंतरवली, जि. उस्मानाबाद, सध्या रा. कोलवडी, ता. हवेली) याला अटक केली आहे. प्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर आणि पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना कोलवडी गावातील गायकवाड वस्ती येथे एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

या पथकाने या परिसरात सापळा रचत वाहतूक करणाऱ्या आंबू पवार याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. तब्बल २१ किलो ६७५ ग्रॅम गांजासह त्याच्याकडील दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.  त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून यात आणखी काही लोकांची समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – २  नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, मयुर सूर्यवंशी, संदीप शेळके, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, संतोष जाचक, योगेश मांढरे आणि महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version