Site icon Aapli Baramati News

कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी अजितदादांची एन्ट्री; अधिकाऱ्यांची उडाली धांदल

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या व्यक्तशीरपणा आणि कार्यपद्धतीमुळे सतत चर्चेत असतात. अजितदादांचा दौरा म्हटलं की अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असते. आजही पुण्यात अजितदादांनी परिवहन विभागाच्या सकाळी ९ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला साडेआठ वाजताच हजेरी लावली. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज परिवहन विभागाकडून रोलर ब्रेक टेस्टर यंत्रणेचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे हेही उपस्थित राहणार होते. सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अजितदादा साडेआठ वाजताच कार्यक्रमस्थळी पोहोचले.

अचानकपणे अजितदादांची एन्ट्री झाल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार इथे झालेल्या कामांची पाहणी करत संपूर्ण माहिती घेतली. मात्र दादा अचानक कशाबद्दल माहिती विचारतील याची शाश्वती नसल्यानं अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.

अनिल परब यांचे आगमन होईपर्यंत अजितदादा या संपूर्ण कामाची माहिती घेत थांबले होते. परब यांचे आगमन होताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र दरम्यानच्या काळात अजितदादांच्या अचानक एन्ट्रीमुळे आणि प्रश्नांमुळे अधिकारी चांगलेच धास्तावले होते.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version