Site icon Aapli Baramati News

क्रेनने घालण्यात आलेल्या पुष्पहारावरून अजितदादांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन केले. या दरम्यान, खराडीत ऑक्सीजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना क्रेनने पुष्पहार घालण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

एवढा मोठा हार घालण्याचा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला. असा हार मी बारामतीत निवडून आल्यानंतरही घातला नव्हता. परंतु अशा गोष्टींमध्ये खर्च करण्यापेक्षा गरजू लोकांना मदत करा. वह्या पुस्तकांसाठी पैसे लागतील त्यांना मदत करा. वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्या असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

यावेळी बोलताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्हाला नियम लावावे लागले, निर्बंध लावावे लागले, पटत नसतानाही नाईलाजास्तव ते करणे भाग होते असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण ऑक्सिजन संदर्भात आता स्वयंपूर्ण झालेलो आहोत. मिशन ऑक्सीजन उपक्रमाचा फायदा होणार आहे. यासाठी कोठेही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यंत्रणाच्या गैरवापरासंदर्भातही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. सध्या दोघांकडूनही यंत्रणांचा गैरवापर होतोय.  पुढचा मागचा विचार न करता बेताल व्यक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.  २५ वर्ष पिंपरी चिंचवडची सूत्र माझ्याकडे होती. मध्यंतरी पराभव झाला, पण लोकशाहीत हार जीत होत असते. शिवाय राज्याच्या आर्थिक नाड्या आपल्याजवळ असल्याने आता सर्वांनी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version