आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे भूसंपादनास गती; पुण्यातील महत्वाकांक्षी रिंगरोडसाठी होणार जुलैअखेरपर्यंत भूसंपादन

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) भूसंपादनाला वेग आला आहे.या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकातील भरीव निधी मंजुर झाल्यामुळे भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली असून येत्या जुलैपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्पे या प्रकल्पाचे करण्यात आले असून पश्चिम भागातील कामाला सुरूवात करण्यात आली आहे. एकूण ६८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ९१० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.

भोर, हवेली, मावळ आणि मुळशी या चार तालुक्यांतून हा रस्ता प्रस्तावित असताना या गावातील जमिनींचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या मदतीने मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रकिया पूर्ण होत मावळ तालुक्यातील पाचर्णे, बेंबडओहोळ, धामणे, परंदवाडी आणि उर्से या पाच गावातील मोजणी पूर्ण करून भूसंपादनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच या गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन खरेदीखत करण्यास सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या गावांमधून जाणार रस्ता

भोर : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव

हवेली :  रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रूक, सांगरूण, बहुली

मुळशी : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, अंबडवेट, घोटावडे, रिंहे, केससेवाडी, पिंपलोळी

मावळ :  पाचर्णे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us