आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

कोथरूडमध्ये १३ वर्षीय मुलाचा खून; पोत्यात बांधून मृतदेह फेकून दिला

पुणे
ह्याचा प्रसार करा

कोथरूड : प्रतिनिधी

कोथरूडमध्ये अल्पवयीन १३ वर्षीय मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एकलव्य पॉलिटेक्निकल मैदानाजवळ हा मृतदेह सापडला. गुरुवारी रात्री उशिरा अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

करण गोपाळ राठोड ( म्हातोबा नगर, कोथरूड) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मैदानाजवळ गुरुवारी सायंकाळी लहान मुले खेळत होती. त्यांना एका पोत्यात करणचा मृतदेह आढळून आला. खेळत असलेल्या मुलांनी लगेच आसपासच्या नागरिकांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर लगेच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.  पोलिसांनी करणचा मृतदेह पोत्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. करणचे आई वडील शहरात मजुरी करतात . याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी चालू आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us