Site icon Aapli Baramati News

SHOCKING NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये हार्डवेअर दुकानाला लागली आग; एकाच कुटुंबातील माता-पित्यासह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड परिसरातील पूर्णानगर येथे एका हार्डवेअर दुकानाला आज पहाटे अचानक आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुकान आणि घर एकाच इमारतीत असल्यामुळे या भीषण आगीत संबंधित कुटुंबातील व्यक्तींनाही जीव गमवावा लागला.

या भीषण आगीत चिमणाराम वेनाराम चौधरी ( वय ४१), नम्रता चिमणाराम चौधरी (वय ३८), भावेश चिमणाराम चौधरी (वय १५) आणि सचिन चिमणाराम चौधरी (वय १३)  या चौघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पूर्णानगर येथील सचिन हार्डवेअर या दुकानाला अचानक आग लागली. ही आग इतकी मोठी होती की काही क्षणात या आगीने रौद्ररूप धारण केले.

या घटनेत चौधरी कुटुंबातील माता-पित्यासह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ चौघांचे मृतदेह बाहेर काढले. मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version