Site icon Aapli Baramati News

पिंपरी चिंचवड पोलिसांची कुरियर फर्मवर कारवाई; मोठा शस्त्रसाठा केला हस्तगत

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. शहरातील दिघी येथील डीटीडीसी कंपनीच्या कुरियर फर्मवर कारवाई करत ९७ तलवारी, २ कुकरी आणि ९ खंजीर अशी हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. ३ लाख २२ हजार रुपये किमतीची ही हत्यारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधरित्या तलवारीचा साठा आढळून आला होता. त्यानुसार सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या पार्सलचे आवश्यक ती खबरदारी घेऊन स्कॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आपल्या गोडाऊनमध्ये असलेला माल कुरिअर कंपन्या एक्स-रे मशीनमधून स्कॅनिंग करत होत्या.

दिघी येथे डीटीडीसी कुरियर कंपनीचे मध्यवर्ती वितरण केंद्र आहे. आरोपींनी काही दिवसापूर्वी डीटीडीसी कुरिअर कंपनी मार्फत दोन लाकडी बॉक्स पार्सल पाठवले होते. १ एप्रिलला या लाकडी बॉक्सचे एक्स-रे स्कॅनिंग केल्यानंतर, बॉक्समध्ये तलवारी सदृश्य वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत हा शस्त्रसाठा जप्त केला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version