Site icon Aapli Baramati News

PCMC Breaking : ‘जरा बारीक व्हा..!’ अजितदादांचा पिंपरी चिंचवडच्या पोलिस उपायुक्तांना भर कार्यक्रमात सल्ला

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादी गोष्ट चुकीची वाटली तर पटकन समोरच्याला सांगून टाकण्याची अजितदादांची पद्धत आहे. त्याचाच प्रत्यय आज पिंपरी चिंचवडमध्ये आला. पोलिसांना अत्याधुनिक वाहनांच्या चाव्या प्रदान करताना पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांच्या तब्येतीकडे पाहून आजितदादांनी थेट त्यांना जरा बारीक व्हा म्हणत तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर चावी स्वीकारण्यासाठी आले होते. त्यांची तब्येत पाहून अवाक झालेल्या अजितदादांनी जाहीरपणे ‘जरा बारीक व्हा’ असा सल्ला दिला.

एवढ्यावरच न थांबता अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली. पोलिसांना तंदुरुस्त राहता यावे यासाठी आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना फिटनेस भत्ता सुरू केल्याचीही आठवण त्यांनी करून दिली. एकूणच आजच्या कार्यक्रमात अजितदादा शारीरिक तंदुरुस्तीबाबत किती आग्रही आहेत हे तर पहायलाच मिळाले. मात्र त्यांच्या रोखठोक स्वभावाची प्रचितीही उपस्थितांना आली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version