आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पिंपरी

Crime Breaking : त्याला वाटलं बाहुली मेली; म्हणून त्यानंही घेतला गळफास, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पिंपरी
ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खेळण्यातील बाहुलीला फाशी दिल्यानंतर एका आठ वर्षांच्या मुलाने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. थेरगावमध्ये ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित आठ वर्षीय मुलगा घरामध्ये बाहुल्यांसोबत खेळत होता. त्याची आईही घरात होती. मुलगा खेळत असल्यानं ती घरातील कामे उरकण्यात व्यस्त होती. या दरम्यान, मुलाचा आवाज येत नसल्याने ती मुलाला पाहायला आली असता मुलाने खिडकीला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याचवेळी बाहुलीलाही टॉवेलच्या सहाय्याने फास दिल्याचे निदर्शनास आले.

या मुलाला थरारक चित्रपट पाहण्याची सवय होती. त्यातूनच त्याने खेळता खेळता आपल्या बाहुलीला टॉवेलच्या सहाय्याने फाशी दिली. आपण फाशी दिल्यामुळे बाहुली मेली ही बाब त्याच्या मनाला लागली. त्यामुळं त्यानं स्वत:ही खिडकीला गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होवू लागली आहे.


ह्याचा प्रसार करा
पिंपरी
Back to top button
Contact Us