Site icon Aapli Baramati News

अक्कलदाढ उशिरा येते; संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई: प्रतिनिधी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून अक्कलदाढ उशिरा येते असे समजले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.शिवतीर्थावरचा भोंगा भाजपचा असून भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे. त्याचबरोबर त्याला टाळ्याही स्पॉन्सर असल्याचा घणाघात राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले. जर बोलायचे असेल तर ते त्यावर बोला. तुमच्या भोंग्याचे काय करायचे. त्यांच्या भोंग्यासाठी राज्य सरकार असमर्थ आहे. शरद पवार यांनी जातीवाद पसरवता असे तुम्ही म्हणता. पण त्याच शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होता हे विसरू नका, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, काल राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतून महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आज संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. शिवसेना आणि भाजप काय करायचं ते पाहून घेईल, दुसऱ्यांनी त्यात पडू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version