आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मुंबई

मुंबई महानगरपालिकेची नारायण राणे यांना तिसऱ्यांदा नोटीस

मुंबई
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेची राणे यांना ही तिसरी नोटीस आहे. तुमच्या घरात करण्यात आलेले बदल का पाडू नयेत, असा सवाल विचारत येत्या सात दिवसांत या नोटीशीचे उत्तर देण्याचे महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे.

नारायण राणे यांचा जुहू येथे आधिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृतपणे बांधकाम केल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे यापूर्वी दोनवेळा मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने बंगल्याची पाहणी केली होती. एकीकडे नारायण राणे यांची यापूर्वीच दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. परंतु या तक्रारीनंतर कोणतीच कारवाई केली नाही, असा आरोप दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार तपास करण्यासाठी नोटीस बजावली आहे.


ह्याचा प्रसार करा
मुंबई
Back to top button
Contact Us