आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मुंबई

‘त्या’ पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडी करणार

मुंबई
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गंभीर आरोप केले होते. त्या आरोपावरून त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्या पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडीकडे सोपविला आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.

ज्या पेन ड्राईव्हने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, त्या  प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने सीआयडीला दिले होते. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.  या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी या मागणीसाठी भाजपने विधानसभेत सभात्यागही केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत. या व्हिडिओमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना राज्य सरकार कशाप्रकारे कारस्थान करत आहेत याचा खुलासा होत असल्याचा त्यांनी केला होता. सव्वाशे तासांचे हे व्हिडिओ जर सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.


ह्याचा प्रसार करा
मुंबई
Back to top button
Contact Us