मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार करत असताना ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या रडारवर होते. आज त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मंत्र्यांवर आणि नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरूच आहेत. त्यातच आता राऊत यांच्यावर इडीने कारवाई केली आहे.त्यांच्यावर ही कारवाई पत्राचाळ जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी केली आहे. त्यांच्यावर जवळपास १०३४ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कारवाईत ईडीने त्यांच्याकडील अलिबागमधील जमिनी आणि इतर मालमत्ता त्याचबरोबर दादरमधील जप्त केली आहे. आतापर्यंतची ईडीची ही सगळ्यात मोठी कारवाई समजली जाते.या कारवाईवर महाविकास आघाडी सरकार आणि संजय राऊत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.