Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांची कुलाबा पोलीस ठाण्यात दोन तास कसून चौकशी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ कायद्यांतर्गत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आज त्यांची कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी दोन तास कसून चौकशी  केली आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबईतील कुलाबा आणि पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात अशा दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांची पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणामुळे २३ मार्च रोजी पुण्यातील पोलीस ठाण्यात चौकशी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या आज कुलाबा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.

फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने त्यांना  २५ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. त्यानंतर आज त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल होत आपली बाजू मांडल्याचे सांगण्यात आले.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version