मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडी आज संपल्यानंतर आज तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तिची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आयटी अॅक्ट कलम ६६ हे कलम वाढवले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जेजे रुग्णालयात तपासणी करून तिला ठाणे कारागृहात पाठवण्यात आले आहे.
आज केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान,गोरेगाव पोलिसांनीही केतकी चितळेचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला. या अर्जावर केतकीच्या वकिलांकडून आक्षेप घेतला गेला. मात्र न्यायालयाने गोरेगाव पोलिसांना ताबा देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सध्यातरी केतकीचा मुक्काम ठाणे कारागृहात असणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केतकीला गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.