Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या युवकाला अटक; ४०० कोटी रुपयांची केली होती मागणी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवत ४०० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या १९ वर्षीय युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणातून या युवकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गणेश रमेश वनपारधी असे या आरोपीचे नाव आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. त्यामध्ये ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होतील अशीही धमकी देण्यात आली होती. तत्पूर्वीच्या मेलमध्ये २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला ठार मारू अशी धमकी दिली होती.

दुसऱ्या मेलमध्ये ४०० कोटी रुपयांची मागणी करतानाच पोलिस आमचा शोध घेऊ शकत नाहीत, त्यामुळे माझा थांगपत्ताही लागणार नाही असं मेलमध्ये नमूद केलं होतं. याबाबत मुकेश अंबानी यांचे सुरक्षा प्रमुख देवेंद्र मुनसीराम यांनी गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. गणेश वनपारधी हा ईमेलवरुन धमकी देत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याला  तेलंगणातून शोधून काढण्यात आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version