आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मुंबई

Big Breaking : सदावर्ते दांपत्याच्या अडचणी वाढल्या; जयश्री पाटील ‘नॉट रिचेबल’, मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ला हा गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेच्या दुसऱ्या दिवसापासून जयश्री पाटील नॉट रिचेबल असून आता मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अचानकपणे आंदोलन आणि हल्ला हा जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याचे पुढे आले आहे. तत्पूर्वीच जयश्री पाटील यांनी आपले पोलिस संरक्षण सोडून दिले. त्यानंतर त्या आजतागायत नॉट रिचेबल आहेत. या हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असून मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या दरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. त्यातच जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मात्र या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून जयश्री पाटील या फरार आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांना आता सातारा पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यातच आता जयश्री पाटील यांचाही शोध मुंबई पोलिसांनी सुरु केला असून सदावर्ते दांपत्याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
मुंबई
Back to top button
Contact Us