Site icon Aapli Baramati News

पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा; २२ मार्चपासून मासिक पास सुरू होणार

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामूळे पुणे-मुंबईची रेल्वे मासिक पासची सेवा बंद आहे.  कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने २२ मार्चपासून रेल्वे मासिक पास व जनरल तिकिट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे-मुंबई असा रोज नियमित प्रवास करणांना  मोठा दिलासा मिळणार आहे.  

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे ही सेवा पूर्ववत होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं नियमितपणे पुणे-मुंबई असा प्रवास करणारे अनेक प्रवाशी आहेत.

कोरोना काळात रेल्वे बंद असल्यामुळे मासिक पास सुविधाही बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे सेवाही सुरळीत सुरु झाली आहे. त्यामुळे मासिक पास सेवा सुरु करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे प्रशासनाचे आभार मानताना प्रवाशांनी स्वतःहून कोरोना नियमांचे पालन करावे,  कमी झालेला कोरोना पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष इक्‍बाल मुलाणी यांनी केले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version