Site icon Aapli Baramati News

Big News : तामिळनाडूतील हेलीकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे निधन

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

तामिळनाडूतील कुन्नूर येथील जंगलात खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. दरम्यान, या घटनेच्या चौकशी आदेशही केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात आज दुपारी ही घटना घडली. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. तेथील एका महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बिपिन रावत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बिपिन रावत यांच्यासोबत १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.कोईमतूरकडे जाताना या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. रावत यांच्या निधनाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भारतीय वायुदलाने अधिकृत माहिती दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version