Site icon Aapli Baramati News

Big Breaking : चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी

ह्याचा प्रसार करा

रांची : वृत्तसंस्था

चारा घोटाळ्यातील पाचव्या आणि सर्वात मोठ्या प्रकरणाचा न्यायालयाने निकाल दिला आहे. याच संबंधीत असलेल्या दोरांडा कोषागार प्रकरणी रांचीतील विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह इतर ७५ आरोपी दोषी आढळले आहेत.

या घोटाळ्यातील चार प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव आणि इतरांना यापूर्वीच शिक्षा सुनावली आहे. आता पाचही खटल्यामध्ये एकच कागदपत्रे आणि साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांना न्यायलयाने दोषी ठरवले आहे. दोरांडा कोषागारातून बेकायदेशररित्या पैसै काढल्याच्या प्रकरणात त्याच साक्षीदार आणि कागदपत्रांच्या आधारे हा निकाल सुनावला आहे.

दरम्यान, चारा घोटाळ्यातील चार प्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव हे सध्या जामिनावर बाहेर आहे. याच खटल्यासाठी त्यांनी रांचीला जाऊन तेथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. बिहारसह देशाचे या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश एस. के.  शशी यांनी सहा महिलांसह २४ आरोपींची पुरावा नसल्यामुळे निर्दोष मुक्तता केली आहे. १८ फेब्रुवारीला न्यायालयाकडून लालू आणि इतर आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. 

हा संपुर्ण घोटाळा १९९० ते १९९५ सालाच्या दरम्यान झाला. दोरांडा कोषागारातून बेकायदेशररित्या तब्बल १३९.३५ कोटी रुपये काढले होते. चारा घोटाळ्यातील सगळ्यात मोठे हे प्रकरण मानले जाते. याप्रकरणात १७० आरोपींवर १९९७ साली गुन्हा नोंदवला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version