
मुंबई : प्रतिनिधी
१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून नागरिकांना सहजपणे लसीकरणाचा लाभ घेता यावा यासाठी काही पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मोबाईलद्वारे तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.
कोव्हिड लसीकरणाची नोंदणी कशी कराल..?
सर्व प्रथम कोविन डॉट जीओवही डॉट इन (cowin.gov.in) या संकेतस्थळावर भेट द्यावी. मोबाईलमधील उपलब्ध कोणत्याही ब्राउजरचा यासाठी वापर करता येईल. त्यानंतर त्यावर रजिस्टर/साइन इन हा विकल्प मिळेल. आईवडिल किंवा स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकल्यावर एक ओटीपी येईल. तो एंटर केल्यावर पुढील प्रक्रिया सूरू होईल.
(Cowin.gov.in) वर स्लॉट कसा कराल बुक?
नोंदणी पूर्ण केल्यावर जर तुम्हाला रिकामा स्लॉट मिळत नसेल तर तो कसा शोधावा आणि कसा बुक करावा, हे पाहुयात. कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर शेड्यूल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनखाली शेड्यूल नाउ वर क्लिक करून पिन कोड किंवा जिल्ह्याच्या नावाच्या सहाय्याने जवळचे लसीकरण केंद्र शोधता येतील. या सूचीत दिसणार्या रिकाम्या स्लॉट वर क्लिक केल्यानंतर तुमचा स्लॉट बुक होऊन जाईल.
पेटीएम आणि दुसर्या अॅप्सच्या मदतीनेही स्लॉट्स बुक केले जावू शकतात. पण सध्या तरी पेटीएम वर फक्त १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी पर्याय उपलब्ध आहेत. वॅक्सीन घेतल्यावर पून्हा कोविन पोर्टल पर जावून यूजर आपले कोविन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो.
याशिवाय वॅक्सीनेशननंतर मोबाईलवर एक टेक्स्ट मॅसेज येईल, ज्यामधे वॅक्सीनेशनची माहिती आणि लिंक मिळेल, तिथूनही सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. वॉट्सअॅपच्या मदतीनेही आपले सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात.