Site icon Aapli Baramati News

सीवुड्स परिसरात मृत पक्षी आढळले, नागरिकांमध्ये चिंता!

ह्याचा प्रसार करा

सीवुड्स परिसरात कबुतर आणि कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

देशातील विविध राज्यामध्ये बर्ड फ्लूने (Bird Flu) टकटक दिलेली असताना नवी मुंबईतील सीवुड्स परिसरात कावळे आणि कबुतरे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत मृत कावळे आणि कबुतरांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही १४ पक्षी मृतावस्थेत आढळले होते.   

नेरुळ पश्चिम भागातील सीवुड्स येथील सेक्टर ४८ अमधील राजगड वसाहतीत आज सकाळी एक कबुतर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. राजगड वसाहतीच्या बाजूला असलेल्या निसर्ग वसाहतीत आणि नवे घरकुल या वसाहतीत देखील कावळे मरून पडलेले आढळले. माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत मृतावस्थेतील कबुतर आणि कावळे ताब्यात घेऊन ती तपासणीसाठी नेल्याचे राजगड वसाहतीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे शाखा अध्यक्ष यशवंत खिलारी यांनी माहिती देताना सांगितले.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version