
शिरूर : प्रतिनिधी
शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी राजूद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान यांनी ही निवड जाहीर केली.
आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक ओळख असलेले राजूद्दीन सय्यद हे विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. तसेच शिरूर परिसरात पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष सोहेल खान, दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्या उपस्थितीत देण्यात आले. आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, जिल्हाध्यक्ष सोहेल खान, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या सहकार्यातून ही संधी मिळाल्याचे राजूद्दीन सय्यद यांनी सांगितले. या पदाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.