Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहा यांच्या भेटीला; भाजप प्रवेशाची शक्यता

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंजाबच्या राजकारणाने नवीन वळण घेतले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या  भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते आज संध्याकाळी  केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. पंजाब काँगेसमध्ये अमरिंदरसिंग व  नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात अंतर्गत वाद होते. काँग्रेस हायकमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देऊ केल्यानंतर त्यांच्यातील अंतर्गत वाद संपतील असे वाटत होते. मात्र आणखीच वाद वाढत गेल्याने अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.  आतापर्यंत अपमान झाला, तो सहन केला. पुढील अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा सिंग यांनी काँग्रेसला दिला होता.

आज अमरिंदर सिंग हे दिल्लीत अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. भेटीनंतर सिंग भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा भाजपला पंजाबमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. जर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपला पंजाबमध्ये स्थिरता प्राप्त होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version