Site icon Aapli Baramati News

फेसबुकने बदलले नाव; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ‘हे’ नवीन नाव

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक कंपनी नाव बदलणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीने आता आपले नाव बदलले आहे. फेसबुक कंपनीने ‘मेटा’ या नवीन नावाची  घोषणा केली आहे.  मात्र फेसबुकचे नाव बदलले असते तरी कंपनीच्या मालकीच्या इतर प्लॅटफॉर्मची नावे तशीच राहणार आहेत. कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीमधून मेटाव्हर्स कंपनी बनणार असल्याचे फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

फेसबूक कंपनीने २००५ मध्ये ‘द फेसबुक’ हे नाव बदलून ‘फेसबुक’ असे नामांतर केले होते. आता फेसबुक कंपनीला आपल्या कंपनीचे नामांतर करण्यासाठी कंपनीचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी ‘मेटा’ या नव्या नावाची शिफारस केली आहे.त्यानुसार फेसबुक कंपनीने ‘मेटा’ या नव्या नावाची घोषणा केली आहे.

सध्या जगभरातील ३ अब्जहून अधिक लोक फेसबुकचा वापर करतात. भारतामध्ये 41 कोटीहून अधिक लोक फेसबुक वापरतात. फेसबुकचे नाव बदलणार असले तरी याच कंपनीच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हाटसअप आणि फेसबुक या अॅपची नावे जैसे थे राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version