Site icon Aapli Baramati News

काँग्रेसला धक्क्यावर धक्के : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या ओएसडीचा राजीनामा !

ह्याचा प्रसार करा

जयपुर : वृत्तसंस्था

पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अमिंदर यांच्या पदाच्या राजीनाम्याचा एक धक्का  सावरत नाही तोवरच कॉंग्रेसला पुन्हा एक नवीन धक्का बसला आहे. पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर त्याचे पडसाद राजस्थानात उमटले आहेत .  पंजाबमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा  यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी काल  मध्यरात्रीच्या सुमारास  गेहलोत यांच्याकडे पाठवला आहे.

शर्मा यांनी ट्विटरवरून राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. पंजाबमध्ये  राजीनाम्याचा स्फोट झाला असताना शर्मा यांनी केलेल्या ट्विटमुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ‘ मजबूरी को मजबूर , मामूली को मगरूर किया जाय…. बाड खेती को खाये, उस फसल को कौन बचाये असं ट्विट शर्मा यांनी केले आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, त्या केलेल्या ट्विचा  राजकारणाची विनाकारण संबंध जोडला जात आहे. मी केलेल्या ट्विचा  पंजाबच्या राजकारणाची जोडत, राजकीय अर्थ काढला आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

शर्मा यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी दहा वर्षापासून ट्विटरवर  सक्रिय असून; चुकीचे म्हणता येईल असे पक्षाच्या विचारधारेपलीकडे काही लिहिलं नाही. मला असलेल्या मर्यादेपलीकडे मी काहीही राजकीय  ट्विट केलेले नाही. तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की,  मी जाणीवपूर्वक असे करत आहे, तर मी आपल्या पदाचा राजीनामा तुमच्याकडे देत आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे म्हणून शर्मा यांनी राजीनाम्याचा निर्णय घेईल यांच्याकडे पाठवला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version