
मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडिया सतत सक्रिय असते. करीना तिच्या अभिनयासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही सारखी चर्चेत असते. करीना तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअस करताना दिसते. करीनाला अनेकदा ट्रोलर केले जाते. तिच्या फोटोवर चाहते अनेकदा कमेंट आणि लाईक करत असतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत करीना घरातून बाहेर पडताना दिसत आहे. करीनाने या व्हिडिओत योगा शॉर्टस आणि डेनिम शर्ट परिधान केला आहे. ती कारकडे जात असताना सिक्यूरिटी करीनाला सलाम करतो. परंतु करिना त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तिचे हे वागणे पाहुण नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “गर्विष्ठ” तर दुसर्या युजरने लिहिले की,“मनी एटीट्युडवाली आंटी.” तसेच काही नेटकरी म्हणतात की,“म्हातारी झाली तरी संस्कार नाही.”
करीनाने २००० साली ‘रेफ्यूजी’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक हिट चित्रपट दिले. करीनाने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले आहे. तिला दोन मुले आहेत. करीनाचा मोठा मुलगा तैमूरही सतत मनोरंजन विश्वात चर्चेत असतो.