आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजनमहानगरेमुंबई

अभिनेत्री करिना कपूर खानने सांगितल्या फिटनेसच्या ‘या’ टिप्स, दोन प्रसूतीनंतरही ती आहे तंदुरुस्त : वाचा सविस्तर

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

करीना कपूर खान आज ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या तरुण अभिनेत्रीनाही मागे टाकून करिना तिची हटके स्टाईल सर्वांसमोर दाखवत असते. अनेकदा तरुण अभिनेत्रींना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावने शक्य नसते. अभिनेत्री करिनाने दोन मुलांना जन्म दिला आहे. तरीही तिचे शरीर अगदी तंदूरूस्त आहे. चला तर मग पाहूयात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना नक्की करते तरी काय?

करीनाने दोन मुलांना जन्म देऊनही ती तरुण अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिना भरपूर व्यायाम करते. यासोबत ती योग देखील करते. आठवड्यातून सहा दिवस व्यायाम करते, तर रविवारी विश्रांती घेते. करिना शूटिंगसाठी किंवा कामासाठी बाहेर जाते, तेव्हा ती नेहमीच तिच्या खाऊचा डबा तिच्या सोबत घेऊन जाते. जेणेकरून भूक लागेल तेव्हा ती जंगी फूड खाणे ऐवजी डब्यातील घरच्यांना अन्न खाऊ शकेल.

करिना नेत असलेल्या डब्यात जास्त करून दही असते. दही खाल्ल्याने भूक लागत नाही आणि मॅग्रेशिअम भरपूर मिळते. तसेच शरीरासाठी चांगले असते याशिवाय त्यातून भरपूर एनर्जी मिळते. करीना जेवणाच्या बाबतीत खूप खडक वेळ पाळते. ती नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर करते. करीना भिजवलेले बदाम आणि केळी खाऊन दिवसाची सुरुवात करते. त्यानंतरच जिमला जाते. करीना दुपारचे जेवण बाराला करते जेणेकरून त्यामुळे अन्न चांगले पचन होते. बेबोला दुपारच्या जेवणात दही-भात, कढी-भात , भाजी आणि रोटी खायला प्रचंड आवडते.

तसेच फळे खाण्याची तिची वेळ दुपारी दोन ते तीन दरम्यान असते. रात्रीच्या जेवणात करिना पुलाव भात आणि दही किंवा मसूर भाजी खाते. करिना संध्याकाळी चहा किंवा कॉफी ऐवजी हंगामी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक किंवा नारळाचे पाणी पिते. या सोबतच ती भिजलेला चिवडा खाते. करीना रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि चिमूटभर जायफळ दुधात घालून पिते. यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि संक्रमणाची लढण्यासाठी क्षमता निर्माण होते. तसेच ती दिवसभर भरपूर पाणी पिते. यामुळे तिची त्वचा नेहमी चमकत राहते.


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us