Site icon Aapli Baramati News

शेतकरी आंदोलनातील अग्रभागी अभिनेता दीप सिद्धूचे अपघाती निधन

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

शेतकरी आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अभिनेता दिप सिद्धूचे अपघाती निधन झाले आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुंडली मानेसर एक्सप्रेस-वेवरील पीपली टोलनाक्याशेजारी हा अपघात झाला. या अपघातामध्ये दीप सिद्धूचा जागेवरच मृत्यू झाला.

दीप सिद्धू दिल्लीहून पंजाबला येत होता. दरम्यान, त्याच्या गाडीची ट्रकला धडक झाली. त्यामध्ये दीप सिद्धू जागीच ठार झाला. या अपघातावेळी दीप सिद्धूसोबत त्याची मैत्रिण रिना राॅय होती, ती या अपघातात जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सोनीपंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दीप सिद्धूचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातामधील ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कृषी कायदे विरोधातील शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे दीप सिद्धू प्रकाशझोतात आला होता. लाल किल्ल्यावर २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी झालेले हिंसाचारप्रकरणी दीप सिद्धूवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप सिद्धू याच्या निधनामुळे सिने जगतात शोककळा पसरली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी दीप सिद्धूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version