आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतमहानगरेराजकारण

मोठी बातमी : प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक; काँग्रेसच्या नेत्याचा दावा

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

लखनऊ : वृत्तसंस्था

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकूनिया येथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारात आठजण मृत्युमुखी पडले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आंदोलनाच्या ठिकाणी मध्यरात्री पोहोचल्या. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. परंतु उत्तर प्रदेश सरकारने अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तिकूनिया येथे एका कार्यक्रमासाठी येणार होते.  त्यांच्या  विरोधात निदर्शने करण्यासाठी कृषी कायद्याच्या विरोधात असणारे शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. या जमावात कथितरित्या दोन कार घुसल्या. त्यामुळे मोठा हिंसाचार घडला असून त्यामध्ये आठ लोक मरण पावले. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ही घटना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात घडली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी या घटनास्थळी येत होत्या. मात्र त्यांना हरगावमधून  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असा दावा श्रीनिवास यांनी ट्विटमध्ये केला आहे. भाजपच्या अपेक्षेप्रमाणे ही घटना घडली आहे. आमचा नेत्या  प्रियांका गांधी भर पावसामध्ये पोलीस दलाच्या तुकड्यांना आणि महात्मा गांधी यांच्या लोकशाही देशामध्ये गोडसे समर्थकांना तोंड देत उभ्या असलेल्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी  पोहचल्या होत्या. मात्र त्यांना अटक केली. ही केवळ लढाईची सुरवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us