नागालँड : वृत्तसंस्था
देशाच्या लोकशाही इतिहासामध्ये प्रथमच विरोधी पक्षासह सगळे पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करणार आहेत. नागालँडचे विधानसभेमध्ये प्रथमच असा इतिहास रचला जाणार आहे. विरोधी पक्षांसह सर्व पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणारे देशातील नागालँड हे देशातील पहिले राज्य असणार आहे.
नागालँड मधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांसह सर्व पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री रेफ्यू रिओ यांनी एका पत्राद्वारे ट्विट करत दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री रेफ्यू रियो यांच्या अध्यक्षतेखाली कोहिमा येथे एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सरकारमध्ये सामील होण्यासाठी विरोधी पक्ष आणि भाजपासह इतर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. या नव्या होत असलेल्या सरकारमध्ये एनडीपीपी , एनडीएफ व भाजपा सहीत इतर अपक्ष आमदारांनी या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला आहे.
नागालँड विधानसभेमध्ये विरोधी पक्ष या सर्व पक्षांनी एकत्र येत स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून; सत्तास्थापनेसाठी या नव्या होत असलेल्या आघाडीला संयुक्त लोकशाही आघाडी असे नाव देण्यात येणार आहे . सध्या स्थिती ६० जागा असलेल्या विधानसभेत प्रमुख प्रमुख पक्ष असलेले एनडीएफच्या २५, एनडीपीपी २०, भाजप १२ , आयएनडी २ असे पक्षीय बलाबल आहे.