Site icon Aapli Baramati News

Winter Session : विरोधी पक्षातील बारा खासदारांचे निलंबन; शिवसेनेच्या दोन खासदारांचा सामावेश

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेच्या  पावसाळी अधिवेशनामध्ये दि. ११ ऑगस्ट रोजी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षातील बारा खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे सहा खासदार, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन खासदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

सभागृहामध्ये गैरवर्तन करून गोंधळ केल्याप्रकरणी आणि कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल या बारा खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचे आज जाहीर करण्यात आले. राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये म्हणजेच पावसाळी अधिवेशनामध्ये ११ ऑगस्ट रोजी या निलंबित खासदारांनी संसदेची प्रतिमा मिलीन होईल असे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच या खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या खासदारांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक खासदार असल्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यासोबतच शिवसेनेचेही राज्यातील दोन खासदार निलंबित करण्यात आले आहेत.

या खासदारांचे झाले निलंबन : 

१) सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस) 

२ ) छाया वर्मा (काँग्रेस)

३) फुलो देव निताम (काँग्रेस)

४) राजमणी पटेल (काँग्रेस)

५) रिपून बोरा (काँग्रेस)

६ ) अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)

७ ) शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)

८) डोला सेन (तृणमूल काँग्रेस)

९) प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)

१०) अनिल देसाई (शिवसेना)

११) एल्लामारम करीम (सीपीएम)

 १२) बिनोय विश्मव (सीपीआय)


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version