Site icon Aapli Baramati News

Sad Demise : दत्तात्रय भरणे यांना मातृशोक; गिरीजाबाई भरणे यांचे निधन

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज सकाळी निधन झाले. आज दुपारी भरणेवाडीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गिरीजाबाई भरणे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

जिजी नावाने परिचित असलेल्या गिरीजाबाई यांनी भरणे कुटुंबीयांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. आज दुपारी २ वाजता भरणेवाडी येथे त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे. त्यांच्या निधनाने भरणेवाडी, अंथुर्णे आणि इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version