कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना आमच्यावर आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक टप्प्यात असून अनेक पुरावे समोर आणणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
करुणा शर्मा यांनी या पुस्तकाबद्दल माध्यमांना माहिती दिली. या पुस्तकात पुराव्यासोबत लग्नाचे फोटो असणार आहेत. हिंदी आणि मराठी या भाषेत हे पुस्तक असून हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झाले असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले. कोल्हापुरातील जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची त्यांची इच्छा असून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीमुळे तेथील विकास खुंटला असून घराणेशाहीचे राजकारण संपवणार असल्याचा विश्वास करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वत:ची सहा मुले लपवली असून अनेक बायकाही त्यांनी लपवल्या आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.