Site icon Aapli Baramati News

Indapur Breaking : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत पंधरा वर्षानंतर सत्ता परिवर्तन; हर्षवर्धन पाटील यांना धक्का

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक निकाल हाती आला आहे.गेली पंधरा वर्ष या पतसंस्थेवर भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाची सत्ता होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने ही पंधरा वर्षाची सत्ता संपुष्टात आणली आहे.

आज झालेल्या मतमोजणीत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने २१ पैकी २१ जागांवर निर्विवाद सत्ता मिळवली आली. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून सर्व शिक्षक मतदारांचे आभार मानले आहेत. निकाल हाती येताच स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने फटाक्यांची आतिशबाजी गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version