कोल्हापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जातीपातीचे राजकारण हवे आहे. महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासूनच सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतच्या वक्तव्याला मी २०० टक्के सहमत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
राज यांचे भाषण हिंदू मनाला आनंद देणारे होते. मी धर्मांध नाही परंतु धर्माभिमानी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मला त्यांचे वक्तव्य खूप आवडले. त्यांच्या भाषणातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरकरांना पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखवले होते. दिवाळीला कोल्हापूरकरांची थेट पाईपलाईनद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने आंघोळ घालू अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. परंतु पाईपलाईनचे पाणी पिण्यासाठी असून आंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी लगावला.