Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणाच्या जबाबदारीत केला बदल; आता चंद्रकांत पाटील कोल्हापुरात, तर राज्यपाल पुण्यात

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात ध्वजारोहण करणार होते. मात्र आता यात बदल करण्यात आला असून पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते, तर कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. तसेच पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीही निश्चित झालेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करून नव्या मंत्र्यांसह विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर केलेल्या यादीत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी होती. तर कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version