Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : बारामती परिसरात ड्रोनच्या घिरट्या; आरोपींचा तात्काळ छडा लावण्याच्या अजितदादांच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांना सूचना

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मागील काही दिवसांत बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी एकाचवेळी चार ते पाच ड्रोन घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे यानंतर काही ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या ड्रोनच्या घिरट्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी चोरीच्या घटनाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. केवळ बारामती तालुक्यातच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.

आज बारामती दौऱ्यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत. ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून तात्काळ या प्रकाराचा तपास करून लवकरात लवकर यातून नागरिकांना दिलासा द्यावा अशा सूचना अजितदादांनी दिल्या आहेत. तसेच ड्रोनच्या घिरट्या आणि चोरीच्या घटना याचा गांभीर्याने विचार करून योग्य ती पावले उचलावीत असेही निर्देश अजितदादांनी दिले आहेत.

दरम्यान, ड्रोन फिरण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या ड्रोनवर कारवाईसाठी उपाययोजना राबवण्याचेही सूचित केले आहे. त्यामुळे आता पोलिस यंत्रणेकडून ड्रोनच्या प्रकाराच्या मूळाशी जाऊन कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version