Site icon Aapli Baramati News

भर चौकात चौघा जणांच्या टोळक्याने तरुणाची केली निर्घुण हत्या; हल्लेखोर फरार

Police line do not cross

ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भर रस्त्यात खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. चौघा जणांच्या टोळक्याने भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घुण हत्या केली. रोहन रामचंद्र नाईक (वय २९, लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभरफुटी,सांगली) असे या हल्ल्यात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन हा पेंटिंगचे काम करतो. तो काल रात्री सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिर्याणीचे साहित्य आणत असल्याचे सांगून घराबाहेर पडला. आंबेडकर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये तो त्याच्या मित्रांसह बसला होता. याच दरम्यान रोहनवर हल्ला करणारे हल्लेखोरदेखील हॉटेलमध्येच बसलेले होते. त्यावेळी रोहन आणि हल्लेखोरांमध्ये वाद झाले. ते वाद मिटवण्यात आले. मात्र रोहन हॉटेल बाहेर पडला. त्याचवेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हल्लेखोर पसार झाले.

जखमी अवस्थेत रोहनला तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी रोहनला मृत घोषित केले.  रोहनचा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version