Site icon Aapli Baramati News

Viral Video : हे पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल; बघून स्वस्थ बसू नका..! महाराष्ट्र पोलिस या नीच प्रवृत्तीचा शोध घेतील का..?

ह्याचा प्रसार करा

बारामती : विशेष प्रतिनिधी 

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळंच लहान मुलांनी कितीही अल्लडपणा केला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.. मात्र सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिला तर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.. एक नराधम बाप आपल्या अवघ्या ५-७ वर्षाच्या मुलाला काठीचे तुकडे होईपर्यंत मारतानाच हा व्हिडीओ अंगावर थरकाप आणतोय.. आता हा व्हिडीओ नेमका कुठला आणि हा नीच प्रवृत्तीचा व्यक्ती कोण याचा शोध महाराष्ट्र पोलिस घेतील का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रत्येक घरात ॲंड्रॉईड मोबाईल आला आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नराधम बाप आपल्या ५-७ वर्षांच्या आतील मुलाला काठीने मारत आहे. तो मुलगा अंगावर काठीचे घाव सोसत विनवण्या करताना दिसत आहे. मात्र तरीही त्या नराधम बापाला पाझर फुटत नसल्याचे या व्हिडीओत पहायला मिळत आहे.

दुसरीकडे हा व्हिडीओ शुट करणारी एक लहानगी मुलगीही आपल्या पित्याला विनवणी करत असल्याचा आवाज या व्हिडीओत येत आहे. मात्र काठीचे तुकडे होवूनही आणि पोटच्या मुलांच्या विनवण्यानंतरही हा नराधम भानावर येत नसल्याचेही या अडीच मिनिटांच्या व्हिडीओत पहायला मिळते. काठीचे २-३ तुकडे झाल्यानंतर हा नराधम थांबत नसल्याने व्हिडीओ शुट करणाऱ्या मुलीने आणखी आर्जव केली. ते शुट करणं बंद कर असं म्हणत हा नराधम बाप त्या मुलीच्या दिशेने येतो आणि व्हिडीओ तिथेच थांबलेला पहायला मिळतो.

एकूणच हा संपूर्ण प्रकार अंगावर थरकाप आणि प्रचंड चीड आणणारा आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला, यातला नराधम बाप कोण याबद्दल सध्यातरी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र आता या व्हिडीओतील व्यक्तीचा शोध घेण्याचं मोठं आवाहन महाराष्ट्र पोलिसांपुढे आहे. या नराधमाचा शोध घेवून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशीच मागणी आता जोर धरु लागली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version