Site icon Aapli Baramati News

‘ती’ कारवाई नागपूर पोलिसांची; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

ॲड. सतिश उके यांच्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले आहे. २००५ पासून उकेंविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. याबाबत नागपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ईडीने काल कारवाई केली आहे.

काल पहाटे ईडीच्या पथकाने उके यांच्या घरी छापा टाकून त्यांची सहा तास कसून चौकशी केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उके हे वारंवार भाजपा नेत्यांच्या विरोधात खटले चालवित  आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उके यांनी आरोप केले होते. दरम्यान सतीश उके हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असल्याने त्यांच्यावरही कारवाई केली गेली आहे, अशी चर्चा सुरू आहे. याच मुद्यावरून आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version