आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
विदर्भ

Crime Breaking : लाटण्यानं मारहाण करत केला दारुड्या पतीचा खून; रात्र काढली मृतदेहाजवळ बसून..!

विदर्भ
ह्याचा प्रसार करा

चंद्रपूर : प्रतिनिधी 

मद्यपी पतीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर लाटण्याने वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. एवढ्यावरच न थांबता पत्नीने अख्खी रात्रच मृतदेहाजवळ काढली. सकाळी आजीकडे गेलेली मुलगी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

चंद्रपूर येथील इंडस्ट्रियल एरिया परिसरात ही घटना घडली आहे. अलकराम मनीराम राऊत (४५) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी सुरजाबाई राऊत हिला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की,  चंद्रपूरमधील इंडस्ट्रियल एरिया परिसरात अलकराम मनीराम राऊत आपल्या पत्नीसह भाड्याच्या घरात वास्तव्य करीत होते. हे कुटुंब मूळचे छतीसगड राज्यातील रहिवासी आहेत. 

मिस्त्रीचे काम करणाऱ्या अलकरामला दारूचे व्यसन होते. त्याच्या रोजच्या दारु पिण्यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. गुरुवारी त्यांची मुलगी चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या आजीकडे गेली होती. दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यामध्ये दोघेही एकमेकांना मारु लागले.  

यात सुरजाबाई हिने पती अलकरामला धक्का दिला. त्यानंतर घरातील लाटण्याने त्याच्या डोक्यावर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडला. संपूर्ण रात्र तिने मृतदेहाजवळच बसून काढली.दुसऱ्या दिवशी आजीकडे गेलेली मुलगी घरी परत आली. यावेळीही तिने आपल्या मुलीला काहीही सांगितले नाही. 

याबाबत मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. पत्नीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
विदर्भ
Back to top button
Contact Us