Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : पेट्रोल पिऊन कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याची आत्महत्या; नागपूर हादरलं..!

ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना नागपूर शहरात घडली आहे. शुक्रवारी (दि. १२) रात्री सेंट फ्रान्सिस डिसेल्स महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने पेट्रोल पिऊन कॉलेजच्या चौथ्या माजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवम कटरे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम कटरे हा बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो महाविद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा संपल्यानंतर शिवमने सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर गेला. त्याने पेट्रोल प्राशन करत तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतली. शिवम उंचावरून खाली पडल्याचे दिसून आल्याने विद्यार्थी तेथे गोळा झाले. शिवमला मोठ्या प्रमाणावर जखम झाल्याचे दिसताच मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर  मृत घोषित केले.

गेल्या काही दिवसांपासून शिवम तणावात होता.  शिवमने गेल्या काही दिवसांपासून मित्रांसोबत बोलणे बंद केले होते, असे शिवमच्या मित्रांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. शिवमने केलेल्या आत्महत्येमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान नागपूर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version